- सुरुवातीला मोबाईल मध्ये असणाऱ्या प्लेस्टोर Playstore मध्ये जायचं आहे.
- तेथे भीम ॲप BHIM APP इन्स्टॉल करायचा आहे.
- भीम ॲप इन्स्टॉल केल्यानंतर एक पिन कोड चार अंकी सेट करायचा आहे.
- त्यानंतर ते ॲप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर प्रोफाइल अपडेट मध्ये जायचं आहे ( डाव्या बाजूला वरच्या साईडला ).
- प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऍड बँक अकाउंट Add Bank account ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचा आहे.
- ऑप्शन Add Bank Acount निवडल्यानंतर तुम्हाला जी बँक ऍड करायचे आहे ती या ठिकाणी सिलेक्ट Select Bank करायची आहे. ( Ex- State bank Of India ).
- बँक सिलेक्ट केल्यानंतर, तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील 1. एक म्हणजे डेबिट कार्ड. 2. आणि दुसरे म्हणजे आधार नंबर. तुम्ही या ठिकाणी दुसरा ऑप्शन निवडायचा आहे आधार नंबर.
- आधार नंबर Aadhaar number निवडल्यानंतर सुरुवाती चे आधार नंबरचे सहा अंक टाका म्हणून ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड वरती सुरुवातीची सहा अंक टाका.
- त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईलवर सहा अंकी ओटीपी येईल. तो यामध्ये भरायचा आहे.
- त्यानंतर यूपी आय पिन सेट set upi pin करायचा आहे.
- त्यानंतर काही सेकंदातच तुमचा अकाउंट सेटअप होईल.
- अशाप्रकारे तुम्ही काही सेकंदातच बिना डेबिट कार्डचे यूपीआय अकाउंट तयार करू शकता. आणि पैसे ट्रान्सफर करू शकता.
👇👇👇👇